स्टेट बँक समोरील पाण्याच्या वॉल साठी भला मोठा खड्डा नगरपंचायत प्रशासनाने खदून ठेवलेला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा होऊन तो तुडुंब भरलेला आहे. रस्त्याच्या अगदी काठालाच हा खड्डा असल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी वारंवार या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाला कळवले. मात्र बघ्याची भूमिका घेत असलेल्या नगरपंचायत ने त्यावर कोणतेही अच्छादन अथवा कुंपण लावले नाही. यापूर्वी त्या खड्ड्यात गाईचे वासरू सुद्धा पडले होते मात्र नागरिकांच्या समय सुचकतेने त्या पिल्याचे प्राण वाचले. आज नेहमीप्रमाणे स्टेट बँके परिसरात नागरिकांची वर्दळ होती. त्यावेळी एक अंदाजे आठ ते नऊ वर्षाचा मुलगा त्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये पडला. त्याचवेळी साई मोबाईल गॅलरीचे प्रोप्रायटर उदय पुंडे यांचे लक्ष त्या मुलाकडे गेले आणि त्यांनी तातडीने त्या मुलाचे प्राण वाचवले. सदर घटनेमुळे पुन्हा एकदा नगरपंचायतचे वाभाडे निघालेले आहेत. शहरात सुविधांचा वाणवा असताना नगरपंचायत अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. याबाबत नगरपंचायतच्या अभियंत्याला जाब विचारला असता तो विभाग माझ्याकडे नाही असे त्यांनी बेजबाबदारपणे उत्तर दिले. यावरून नगरपंचायत अधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येते. तरी नगरपंचायत प्रशासनाने आता तरी या बाबीकडे गंभीरतेने बघत संबंधित पाण्याच्या वालवर चेंबर बसवण्याची नागरिकांची मागणी आहे.
मी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्या उघड्या वालवर लवकरच चेंबर बसवण्यात येईल.
-
रवींद्र राऊत,
मुख्याधिकारी नगरपंचायत ढाणकी

0 टिप्पण्या