आपली लढाई ही सत्ताधाऱ्यां विरुद्ध शेतकरी अशी. महाएल्गार सभेत बच्चू कडू यांनी केला सत्ताधाऱ्यांवर प्रहार.

 


ढाणकी येथे दिनांक 12 सप्टेंबर रोजी माजी राज्यमंत्री ,प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची महाएल्गार सभा स्थानिक आर्य वैश्य मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेत बच्चू कडू यांनी सत्ताधार्‍यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला सत्ताधारी आणि सरकारच जबाबदार असल्याचे बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं. राज्यातील शेतकरी राब राब राबून कष्ट करत आहे. मात्र त्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळत नाही. अतिवृष्टीने तोंडाचा घास गेला मात्र शासन फक्त बघायची भूमिका घेत आहे.   निवडणुका जवळ आल्या की कर्जमाफीची घोषणा होते मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना शेतकऱ्याचा विसर पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या हक्काची जाणीव आता व्हायला हवी जेणेकरून त्यांना त्यांचा स्वतःचा माला योग्य तो दरात विकता येईल आणि स्वतःची हित साधता येईल अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .बच्चू कडू यांना ऐकण्यासाठी बाहेर पाऊस चालू असतानाही मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग जमला होता. त्यांच्या या एल्गार सभेने शेतकऱ्यांमध्ये एक नव संजीवनी संचारलेली दिसत होती . बुटीबोरी नागपूर येथील मोर्चामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले. त्याचबरोबर सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पावर बोलताना त्यांनी म्हटले की , मी आणि माझा पक्ष सदैव शेतकऱ्यांसोबत असून आम्ही सहस्त्रकुंड प्रकल्प विरोधात खांद्याला खांदा लावून लढू. मागच्या वेळेस ढाणकी येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात ज्या आंदोलकावर गुन्हे दाखल झाले त्यांचा सुद्धा बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये बंटी जाधव, सादिक शेख, जॉन्टी विणकरे यांचा समावेश आहे.  सभेसाठी खेड्यापाड्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी दिव्यांग बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेनंतर प्रहार चे तालुकाप्रमुख सय्यद माजिद यांच्या निवासस्थानी धावती भेट देऊन बच्चू कडू हे उमरखेड करता रवाना झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या