उमरखेड तालुक्यातील बिटरगावं बु येथे असलेल्या अंगणवाडी इमारतीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. टिन पत्रे उडून गेली असून भिंती ही जीर्ण झाल्या आहेत. उघड्या पत्रा मुळे पावसाचे पाणी चक्क अंगणवाडीत येत असल्याने चिमुकल्यांना पाण्यात भिजत शिक्षण घ्यावे लागत आहे , शिवाय पाणी हे भिंतीत मुरत असल्यामुळे भिंतीही या कमजोर होत असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, वारंवार मागणी करूनही संबंधित प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे.
बाल विकासामध्ये अंगणवाडीचे सर्वात जास्त महत्त्व आहे. बालकांच्या विकासाची सुरुवात ही अंगणवाडीतूनच होत असते. ज्या अंगणवाडीतून उद्याचे भवितव्य घडणार आहे त्याच अंगणवाडीची इमारत धोक्याच्या स्थितीत असल्याने पालक वर्ग मध्ये सुद्धा भीतीचे वातावरण आहे. बिटरगाव बुद्रुक येथील सदर अंगणवाडीची इमारत ही वीस वर्षे जुनी झालेली आहे तेव्हा तिच्या डागडूगीची अत्यंत गरज आहे. अंगणवाडीच्या इमारतीच्या या जीर्ण अवस्थेमुळे पालक वर्ग सुद्धा आपल्या चिमुकल्यांना आता अंगणवाडीत पाठवणासे झालेले आहेत. संबंधित प्रशासनाने या बाबीची गंभीरतेने दखल घेणे गरजेचे आहे अन्यथा नागरिकांच्या रोषा ला त्यांना सामोरे जावे लागेल. The roof of the Anganwadi was blown away. The walls were also weakened. तरी लवकरात लवकर अंगणवाडीचे बांधकाम करून देण्याची नागरिकांची मागणी आहे. जर प्रशासनाने या बाबीची दखल न घेतल्यास लोक वर्गणीतून अंगणवाडीची दुरुस्ती करू व येणाऱ्या निवडणुकीत सर्व नेते मंडळींना गाव प्रवेश बंदी करू असे गावकऱ्यांनी बोलताना सांगितले.


0 टिप्पण्या