चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा यासाठी ग्राम महसूल सेवक संघटनेचा 12 सप्टेंबर रोजी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा.


शासनाच्या विविध योजनांच्या माहितीची खेडेगाव पातळीवरील अंतिम घटकांपर्यंत पोहोचण्याचे 24 तास काम करणाऱ्या व शासनाकडून नेहमीच उपेक्षित असणाऱ्या कोतवाल म्हणजेच ग्राम महसूल सेवक यांना शासनाने चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा या मागणीसाठी विदर्भ महसूल सेवक संघटना उमरखेड शाखेच्या वतीने उमरखेड तहसीलदार आर यु सुरडकर यांना निवेदन देऊन दि 12 सप्टेंबर रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. ग्रामीण भागाच्या विकासाच्या जडणघडणीत महसूल तलाठी साजा तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयात कोतवाल महसूल सेवक म्हणून 24 तास सेवा देऊन शासनाच्या तुटपुंज्या आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडतात .परंतु शासनाने अद्याप पर्यंत कोतवाल महसूल सेवक या पदाला शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाहीत .त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना कोतवाल हा घटक शासनाकडून उपेक्षित राहिला आहे .हा अन्याय शासनाने दूर करून महसूल सेवक (कोतवाल ) यांना इतर महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन कोतवालावरील अन्याय दूर करावा या मागणीसाठी आज दि . 10 सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून निदर्शने केली .उद्या दिनांक 11 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय एक दिवशी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .दिनांक 12 सप्टेंबर रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या क्षेत्रामध्ये क्रिडा  संकुल कोराडी येथील आवारात बेमुदत काम बंद धरणे आंदोलन तसेच साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा उमरखेड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे .


निवेदनावर तालुका शाखा संघटनेचे अध्यक्ष अभिलाष आर गायकवाड, उपाध्यक्ष जी पी काळबांडे ,सचिव एस एस वाघमारे, यांच्यासह विश्वंभर भोगाळे, सय्यद इबादुल्ला, प्रकाश ससाने, एकनाथ पोहणे, वसंता भांडवले, छाया शेळके, वैष्णवी शिंदे, प्रकाश काळबांडे  ,संघप्रिया वाघमारे, आकांक्षा धुळे, दीक्षा लोमटे, आशा चिरंगे,  गोपाल सरकाडे ,ओमकार हिंगडे, शिवकांत मोरे ,संतोष जाधव गोपाल काळबांडे आदि ग्राम महसूल सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या