सद्यस्थितीमध्ये मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाले ओवर फ्लो वाहत आहेत. ढाणकी शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा आटरी पुला वरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटलेला होता. पुलावरून पाणी वाहत असल्याने रुग्णाला उपचार मिळणे सुद्धा कठीण झाले होते . पुलावरून पाणी वाहत असल्याने कुरळी येथील गर्भवती महिला सविता करण राठोड व तिचा पती व इतर सहकारी पाणी उतरण्याची वाट पाहत होते ,परंतु पाणी उतरत नसल्याने अखेर सदर घटनेची कल्पना बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना फोन वरुण देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार पांडुरंग शिंदे हे आपले सहकारी मोहन चाटे, रवी गिते, प्रवीण जाधव इतर पोलीस कर्मचारी यांना घेऊन खरुस रोड वरील नाल्या कडे रवाना झाले. परंतु पुराचे पाणी ढाणकी गावातील किरण नगरीं पर्यंत आल्याने पुराच्या पाण्यातून सविता करण राठोड या गर्भवती महिलेला सायंकाळी 7 वाजता रात्रीच्या अंधारात आणणे फार मोठे जिकरीचे काम होते. थोडे जरी कमी जास्त झाले तर गर्भवतीचा जीव धोक्यात आला असता मात्र आपल्या जीवाची कोणतीही परवा न करता ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस जामदार मोहन चाटे, रवी गिते , प्रकाश मुंडे व गावकरी यांनी गरोदर महिलेला आटरी च्या पूलावरील पाण्यातून अगदी लहान लेकरा प्रमाणे उचलून आणून दवाखान्यात भरती केले.त्यामुळे गर्भवती महिलेचा जीव वाचला. सदर घटनेमुळे बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे. आपल्या जीवाची परवा न करता एका गर्भवती महिलेसाठी सर्व पोलीस टीम धावल्यामुळे पुन्हा एकदा पोलीस हे सामान्य जनतेची मित्रच आहेत ही सिद्ध झाले. विशेष म्हणजे दबंग पोलीस कर्मचारी मोहन चाटे , रवी गीते यांच्या धाडसाचे नागरिक कौतुक करत आहेत.

0 टिप्पण्या