पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यां सह बंदी भागातील प्रवासी ढाणकीत अडकले. आटरीच्या पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी.

सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचे थैमान सुरू असून कालपासून ढाणकी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ढाणकी जवळून वाहणारा आटरी नाल्या च्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्या सह बाहेर गावावरून आलेले प्रवासी हे ढाणकी येथील बस स्टॅन्ड वरती अडकून पडले.  पुलावरील पाणी कमी होत नसल्याने प्रवासी यांना ढाणकी येथेच आपला मुक्काम करावा लागला. प्रवाशांसोबत विद्यार्थी आणि काही लहान मुले असल्याने त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. बंदी भागातील अनेक गावे ढाणकी नगरींशी जोडलेले असल्याने त्यांना तालुक्याला जाण्यासाठी ढाणकी येथून जावे लागते. दोन दिवसा पासून वरूण राजा मनसोक्त बरसत असल्याने आज सकाळ पासून पुलावरून पाणी वाहत आहे. उमरखेड बस आगाराच्या काल रात्री गेलेल्या बसेस मोर्चेडी, गाडीबोरी, एक स्कूल बस नाल्या च्या पलीकडे अडकून पडली. सकाळी शाळेत गेलेले शिक्षक, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे सुद्धा आटरी नळ्याच्या पलीकडे अडकून पडले.

ज्ञानज्योती इंग्लिश मेडीयम शाळेचे 50 विद्यार्थी पुलावर पाणी आल्याने शाळेत अडकून आहेत. कस्तुरबा गांधी कन्या शाळेच्या मुली पुलावर पाणी आल्याने ढाणकी शहरात अडकून आहेत. दोन्ही शाळेतील विद्यार्थी यांची रात्र भर शाळेतच अडकून पडले. आटरी नाल्या वरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी अनेक वर्षा पासून चालू आहे. परंतु प्रशासन बंदी भागातील गावाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे . साधारण पावसाच्या सरी जरी आल्या तरी बंदी भागातील नागरिकांना ढाणकी शहरात रात्र काढावे लागते. पंधरा वर्षा पासून एकाच पक्षाची सत्ता असूनही बंदी भागातील मागणीला केराची टोपली दाखवत असल्याने बंदी भागातील गावे सत्ताधाऱ्या विरुद्ध रोष व्यक्त करतांना दिसत होते. पुराच्या पाण्यामुळे बंदी भागातील प्रवासी ढाणकी येथील बस स्टॅन्ड वर अडकून असल्याचे कळताच भाजपा युवा जिल्हा अध्यक्ष रोहित वर्मा यांनी प्रवास्याची  राहण्याची व जेवण्याची व्यवस्था आर्य वैश्य मंगल कार्यालय येथे केली प्रवास्यांनी रोहित वर्मा यांचे आभार मानले. यावेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी विणकरे , बीट जमदार मोहन चाटे, पत्रकार विनोद गायकवाड, ब्रह्मानंद मुनेश्वर यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या