अखेर ढाणकी माहुर बससेवा सुरू -भारत मुक्ती मोर्चा च्या मागणीला यश.


माहुर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पवित्र शक्तिपीठ आहे. शिवाय येथे विविध धर्मियांची पवित्र प्राचीन प्रार्थनास्थळे, प्राचीन किल्ला,लेण्या आहेत.अशाच उमरखेड आगाराद्वारे माहूर येथे ढाणकी मार्गे जाण्यासाठी बस नव्हती.ज्यामुळे ढाणकी शहराला लागून असणारी जवळपास पन्नास खेड्या पाड्यातील प्रवाशांना खाजगी व इतर वाहनाने उमरखेड मार्गे लांब पल्ल्याचा आणि वेळेचा प्रवास करीत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. ही  समस्या कळताच भारत मुक्ती मोर्चाद्वारे युवा नेतृत्व इंजि.विद्वानभाऊ केवटे यांच्या नेतृत्वात दिनांक 19/09/2025 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ जिल्हा विभाग नियंत्रक यांना  उमरखेड आगार व्यवस्थापक यांचे मार्फत कार्यकर्त्याच्या उपस्थित निवेदन देण्यात आले होते. आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांनी भारत मुक्ती मोर्चाच्या निवेदनाची तत्काळ दखल घेत प्रवाशांच्या सेवेत दिनांक 25/09/2025 रोजी माहूर बस मार्गे ढाणकी -फुलसावंगी -महागाव -धनोडा अशी सुरू करण्यात आली.

यावेळी ढाणकी शहरात ही गाडी येताच भारत मुक्ती मोर्चा द्वारे हा बसचे वाहक प्रतिभा हणवते व चालक  सुदर्शन कदम ,यांचे शाल आणि श्रीफळ देऊन,यांस बस ला पुष्पहारांचे तोरण बांधून मोठ्या उत्साहात  स्वागत करण्यात आले. पुढे निंगनुर येथे देखील अंकुश राठोड यांसह गावकऱ्यांच्या वतीने हा बस चे स्वागत केले गेले. पहिल्याच दिवशी ही बस प्रवाशांनी पूर्णतः भरल्यामूळे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. ह्या बस प्रवासाचे उद्घाटन भारत मुक्ती मोर्चा चे मिलिंद चिकाटे, दिलीप कलाले यांसह सौरभ मिटकरे यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष भारत कांबळे, अमोल पाटील, शेख जब्बार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राजू हणवते, मुनव्वर खान, विक्रम प्रेमिलवाड, माधव वाठोरे,संतोष चंद्रवंशी यांसह माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचे चव्हाण, तसेच पत्रकार संघाचे, दिगंबर बल्लेवार, ब्रम्हानंद मुनेश्वर, शेख इरफान, विनोद गायकवाड,यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या