शहरातील अल्पवयीन मुलीवर खाजगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकाने अत्याचार करत गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 22 सप्टेंबर रोजी उघडीस आली. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले. आरोपी संदेश गुंडेकर याला बीटरगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली. तसेच शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने आज त्या घटनेचा निषेध करण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सर्व प्रतिष्ठाने सकाळ पासूनच व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. त्यामुळे शहरात एक प्रकारे तणावपूर्व शांतता होती. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहरातील नागरिक एकत्र जमले आणि सर्वप्रथम त्या अल्पवयीन मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली व आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी एकमुखाने मागणी नागरिकांनी केली. शिक्षकी पेशा हा पवित्र मानला जातो. या पेशाला काळीमा फासण्याचे काम संदेश गुंडेकर यांनी केले. अशा घटना पुन्हा घडू यासाठी सुद्धा आता पालक वर्गाने जागरूक राहणे गरजेचे झालेले असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले. झालेली घटना ही अत्यंत निंदनीय असून संबंधित आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी व हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
दामिनी पथकाची अत्यंत गरज
शहरामध्ये परिसरातील सर्वात मोठी मुलींची शाळा असून बारावीपर्यंत त्या शाळेत शिक्षण दिल्या जाते. त्यामुळे खेड्यापाड्यातील मुली शिक्षणासाठी शहरात येतात. अशावेळी चिडीमारी करणारे मुले शाळा व परिसरामध्ये फिरत असल्याने मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वर आला आहे. याआधी सुद्धा शहरातील नागरिकांनी दामिनी पथकाची मागणी केली होती मात्र प्रशासनाने या बाबीला गांभीर्याने घेतले नाही.


0 टिप्पण्या