सोशल मीडियाचा कोण कसा वापर करेल हे सांगता येत नाही. या माध्यमातून कधी जनजागृती तर कधी निषेध सुद्धा केल्या जातो. आज अभियंता दिनानिमित्त पुसद उमरखेड परिसरातील जनतेने बांधकाम विभागातील #Engineer day अभियंत्यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या. अनेक नागरिकांनी ते स्टेटस ठेवले. त्यामुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. पुसद ते उमरखेड रस्ता अतिशय खराब झाला. ह्या रस्त्यावर मोठ मोठ खड्डे पडले असून त्यामुळे किरकोळ अपघात होऊन अनेकांना आपले हात, पाय,कम्बर मोडून घेतली तर काहींनी आपले प्राण सुद्धा गमावले .सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली मात्र प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही. या रस्त्या कडे लक्ष देण्याची जबाबदारी असलेला अभियंता रस्त्यात काही सुधारणा करतांना दिसत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक चांगले संतापलेले आहेत. आज योगायोगाने अभियंता दिन असल्याने परिसरातील बऱ्याचश्या नागरिकांनी आजच्या अभियंता दिवसाच्या " पुसद ते ढाणकी रस्त्यावर नियुक्त असलेला अभियंता सोडून इतर सर्व अभियंत्यांना अभियंता दिवसाच्या शुभेच्छा" असे स्टेटस ठेवून उपरोधित टोला मारला. Engineer day कदाचित हे स्टेटस बघून तरी संबंधित अधिकाऱ्याचे डोळे उघडतील आणि लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची काम होईल ही नागरिकांना आशा आहे. गमतीचा विषय सोडला तर या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा परिसरात चांगल्याच चर्चेला जात आहे.

0 टिप्पण्या