सततच्या विजेच्या लपंडावाने ढाणकी शहरात चोरीच्या घटना घडण्याची शक्यता. महावितरण चा गलथान कारभार नागरिकांच्या जिवावर उठणार?


ढाणकी -शहरात सततच्या विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले असून दिवसभर तर विजेच्या लफाछपी चा खेळ सुरू असतोच मात्र गेल्या काही दिवसांपासून रात्रीला सुद्धा  विज गुल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काल रात्री तर चक्क दोन वाजता विज आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र या संधीचा चोरट्यांनी फायदा घेतल्याची चर्चा असून कोणताहि अनुचित प्रकार घडला नाही हे नागरिकांचे दैव च म्हणावे लागेल. शहरातील संविधान चौकात एका चार चाकी वाहनावर अंडे फेकून सदर वाहन लुटण्याचा प्रयत्न अंदाजे सात चोरट्यांनी केल्याची चर्चा असून काही चोरट्यांनी गावात सुद्धा वावरले असल्याचे बोलले जात आहे त्यामूळे पोलीस प्रशासनाने आता रात्रीची गस्त वाढविने गरजेचे आहे.  यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून महावितरणच्या या गलथानपणाचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता आहे आणि यामुळे एखादी मोठी घटना सुद्धा घडू शकते. आज चोरटे शहरात वावरले ऊद्या चोरीही होऊ शकते तेव्हा वेळीच सावध होने गरजेचे आहे. 

 ढाणकी ही बाजारपेठ मोठी असून दिवसभर बंदी भाग तसेच इतर खेड्यातील लोके आपली कामे करण्यासाठी शहरात येतात मात्र थोड्या थोड्या करण्यासाठी शहरांतील वीज बंद करण्यात येत असल्याने त्याचा फटका नागरिकांसोबत व्यापाऱ्यांनाही बसत आहे. आज सर्व कामे ऑनलाईन झाल्याने लाईट गेल्यानंतर ते ठप्प होत आहेत त्यामुळे नागरीकांना विजेेची देेेेवा सारखी वाट बघावी लागत आहे. एकंदरीत ढाणकी शहरात महावितरण चे नियोजन शून्य असून वारंवार लाईट जाण्याचे कोणतेही ठोस कारण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे नाही. त्यामुळे भविष्यात अंधाराचा फायदा घेऊन काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण ची राहील चे नागरिकांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या