ढाणकी गुटखा व्यवसायिकांची जाळे ढानकी परिसरात फोफावत असताना हिमायतनगर मार्ग ढाणकी कडे येणारा प्रतिबंधित सुगंधी गुटखा सोईट गावाजवळ बिटरगाव पोलिसांनी सापळा रचून पकडला यामुळे गुटखा व्यवसायिकांचे धाबे दानाणले आहे. दिनांक 11 जुलै रोजी ठाणेदार सुजाता बनसोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बिटरगाव पोलिसांनी सोईट महागाव येथे सापळा रचला. हिमायतनगर येथून येणारा एक लाल अप्पे मालवाहू ऑटो संशयितरित्या ढाणकी कडे येताना पोलिसांना आढळला तेव्हा चौकशीसाठी मालवाहू ऑटो थांबवला असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधित केलेला गुटखा आढळला. तेव्हा पोलिसांनी अब्दुल वाजिद अब्दुल करीम वय 50 वर्ष , सय्यद आमिर सय्यद खमर वय 40 दोघेही राहणार हिमायतनगर यांच्या मुसक्या आवळल्या.या कारवाईमध्ये मालवाहू ऑटो ची किंमत धरून अंदाजे 599600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्हीही आरोपीवर भांदवी कलम 188, 272, 273, 328 सहकलम 59, 26(2), 27, 30( 2) (अ ), कलम 59 प्रमाणे गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुजाता बनसोड, उपनिरीक्षक शिवाजी टेंभुर्णे, पोलीस जमादार मोहन चाटे , निलेश भालेराव, प्रवीण जाधव, देविदास हाके, होमगार्ड चंद्रमनी वाढवे करीत आहेत. या कारवाईमुळे गुटखा व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दनानले असून ज्या प्रमाणे आज हिमायतनगर मार्गे येणाऱ्या गुटखावर कारवाई झाली त्याप्रमाणे आता महागाव, फुलसावंगी मार्गे येणाऱ्या गुटखा तस्करीला आळा घालून कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ठाणेदार सुजाता बनसोड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ही मोठी कारवाई झालेली आहे आता गुटखा तस्करीला आळा घालण्यात त्या कितपत यशस्वी ठरतात ही येणारी वेळ सांगेल तूर्तास तरी या कारवाईमुळे गुटखा व्यावसायिक चांगलेच घाबरल्याचे बोलले जात आहेत.

0 टिप्पण्या