ढाणकी पावसाळा सुरु झाला असताना देखील ढाणकी शहरातील नागरिकांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरला नाही. पाणी टंचाई संदर्भात नगरपंचायत च्या अधिकाऱ्यांच्या पुढे लोकप्रतिनिधी देखील आता हतबल झाले असून पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. शहराला पाणी टंचाई चा सामना करावा लागू नये म्हणून गांजेगाव येथील पैनगंगा नदी वरून दोन वेळ पाईप लाईन टाकली, पाणी टंचाई काळात टंचाई निवारण्याचे काम नदी वरील पाईप लाईन ने केले व नदिवरील वरील दूषित पाणी शुद्ध करण्याकरीता लाखो रुपये खर्च करून पाणी फिल्टर बसवण्यात आला. तसेच नदी वरील पाईप लाईन विद्युतअभावी खंड पडू नये म्हणून ढाणकी वीज वितरण सबस्टेशन येथून नदी पर्यंत स्पेशल फिडर लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आला परंतु नगरपंचायत झाल्या पासून नगरपंचायत पाणी पुरवठा आभियंत्याने कधीच नदी वरील विहीर पाईप लाईन चालू करून पाहिली नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल. लोकप्रतिनिधीने वेळो वेळी नदी वरील पाईप लाईन चालू करण्याची मागणी केली मात्र पाणी पुरवठा अभियन्ता यांनी नगरसेवकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली.
ढाणकी नगरीत भीषण पाणी टंचाई जाणवत असताना सुद्धा फक्त दोन विहीर अधिग्रहण केल्या गेल्या. तत्कालीन ग्रामपंचायत असते वेळी नदी वरील पाईप लाईन तर चालूच होती पण सोबतीला गावातील आजू बाजूच्या पाच सहा विहीर अधिग्रहण करत करत असे तेव्हा कुठे पाणी टंचाई मिटत होती. नगरपंचायत झाल्याने आपली पाणी टंचाई दूर होऊन डोक्या वरील हांडा खाली उतरेल अशी भाबडी आशा ढाणकी शहरातील नागरिकांना होती. मात्र नगरपंचायत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहर अजून पाणीटंचाईच्या खाईत लोटल्या गेले. नगरपंचायत अभियन्ता यांनी वेळीच ढाणकी नगरी तील पाणी टंचाई कडे लक्ष दिले असते तर भर पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवली नसती आणि नागरिकाला रात्र रात्र जागून पाणी भरावे लागले नसते. शहरातील नागरिकांची उपजीविका शेतीवर अवलंबुन आहे. पावसाळा असल्याने नागरिकांनी शेतीचे दिवसा कामे करायची आणी रात्री घरी पाणी भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी कारणीभूत असलेल्या पाणीपुरवठा अभियंता यांनी कर्तव्यात कसूर केला म्हणूनच ढाणकी शहराला या तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. तेव्हा अशा कामचुकार अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच शहरातील या पाणीटंचाईला संपूर्णतः नगरपंचायत प्रशासनच कारणीभूत असल्याचा आरोप देखील नागरिक करत आहेत.
शहरातील पाणीटंचाईला मी जबाबदार नाही. याला अनेक घटक कारणीभूत आहेत. जसे की नगरपंचायत कडे फंड नाही, महावितरण चे पैसे थकीत आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित आहे आणि इतरही काही टेक्निकल बाबी आहेत.आणि मी पदभार स्वीकारण्याआधी सुद्धा ढणकी शहरांमध्ये पाणीटंचाईच होती त्यामुळे शहरातील पाणीटंचाईला सर्वस्वी मी जबाबदार आहे हे म्हणणे चुकीचे आहे.
अंजली सोळंके,
पाणीपुरवठा अभियंता, नगरपंचायत ढाणकी
ढाणकी शहरातील पाणी टंचाई हि नैसर्गिक नसून नगरपंचायत पाणी पुरवठा अभियंता यांच्या हलगर्जी पणामुळे होत आहे. नदी पात्रात मुबलक प्रमाणात पाणी असते वेळी पाण्यासाठी नागरिकाला वणवण भटकंती करावे लागत आहे. वेळीच नदीवरील पाईप लाईन चालू केली असती तर पावसाळ्यात नागरिकाला 25 दिवस नळाला पाणी येण्याची वाट पाहवी लागली नसती. पैनगंगा नदी पात्रातील पाईप लाईन आठ दिवसात चालू केली नाही तर नगरपंचायत समोर आंदोलन करण्यात येईल.
संजय कुंबरवार
शिवसेना तालुका प्रमुख उमरखेड
.jpeg)
0 टिप्पण्या