ढाणकी पोलीस स्टेशन येथे नुकत्याच रुजू झालेल्या ठाणेदार सुजाता बनसोड यांना दि. १४ जुलै रोजी, गोपणीय माहितीवरून स्वप्निल रमेश पराते वय २५ रा. ढाणकी, हा अवैध देशी दारू वाहतूक करताना मिळून आला. त्याच्याजवळ १९२ देशी दारूचे बॉटल, ४ पेटी, किंमत १३४४० रुपये व मोटार सायकल क्रमांक MH 29 DK 1638, ही ५० हजाराची मोटरसायकल, असा एकूण ६३४४० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.
वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरची कार्यवाही एपीआय सुजाता बनसोड यांचे मार्गदर्शनात, पीएसआय शिवाजी टिपूरणे, बीट जमादार मोहन चाटे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश भालेराव, प्रवीण जाधव यांनी केली. पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन करीत आहे.
.jpeg)
0 टिप्पण्या