आजच्या स्थितीला आपण शासकीय नोकऱ्या उपलब्ध नसल्याची नेहमीच ओरड करतो. मात्र इच्छा तेथे मार्ग म्हणी प्रमाणे कठोर मेहनत करणाऱ्याला अपयश कधीच येत नाही आणि यशाचे मार्ग आपोआप सापडतात हे आदिनाथ आणि लक्ष्मण यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
मूळचे महागाव तालुकत्यातील वेणी धरण येथील असलेले नामदेव गायकवाड पंचवीस वर्षांपूर्वी कामाच्या शोधात ढाणकी या शहरात येऊन टेंभेश्वर नगर या वस्तीत स्थायिक झाले. आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी गवंडी काम स्वीकारले. मात्र आपल्या नशिबी आलेले कष्ट आपल्या मुलांच्या नशिबी येऊ नये यासाठी त्यांनी मनात खुणगाठ बांधली. आणि मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना शासकीय नोकरीचे दरवाजे उघडून दिले. कठीण परिस्थितीमध्ये ही मुलांना चांगले शिक्षण दिल्याने नामदेव गायकवाड व त्यांच्या पत्नी विमल गायकवाड यांचे ढाणकी शहरात कौतुक होत आहे.
"अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये नामदेव गायकवाड यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करून सरकारी नोकरी मिळण्यासाठी कठोर मेहनत घेतली खरंच त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांचा कुठेतरी योग्य ते सन्मान व्हावा याकरिता भाजपा ढाणकीतर्फे आम्ही त्यांचा त्यांचा सप्तनिक सन्मान केला आणि शहरातील युवकांनी आदिनाथ आणि लक्ष्मण यांचा आदर्श घ्यावा."
रोहित विष्णूदासजी वर्मा, भाजप शहराध्यक्ष ढाणकी.

0 टिप्पण्या