ढाणकी प्रतिनिधी-
टेंभुरदरा गावठाण ते अकोली पांदण रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून रखडले असून ते काम त्वरित सुरू करण्याची मागणी टेम्भूरदरा वासियांची आहे.
टेंभुरदरा ते अकोली हा पांदण रस्ता शेतकरी व नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना शेतात येजा करण्यासाठी तसेच आपली बी बियाने शेतात नेआन करण्यासाठी या रस्त्याचा मुख्यत्वे करून वापर होतो. उन्हाळ्याचे ठीक आहे मात्र पावसाळ्यात अक्षरशः शेतकऱ्यांना बियाणे डोक्यावर घेऊन जावी लागतात. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा याबाबत वेळोवेळी मागणी केली तसेच रस्ते बांधण्यासाठी लेखी संमती सुद्धा दिली. अकोली पांदण रस्ता हा नागरिकांसाठी सुद्धा सुविधेचा असून या मार्गाने अकोली, मन्याळी , बिटरगाव मार्गे किनवट ला जाता येते त्यामुळे सुद्धा महत्त्वाचा रस्ता आहे. याच रस्त्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सुद्धा पत्र दिलेले असूनही अद्यापही या कामासाठी कोणतीही हालचाल नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या टेम्भूरदरावासियांनी या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
"वाहतुकीसाठी हा पांदण रस्ता महत्त्वाचा असताना सुद्धा विभागाचे आमदार नामदेव ससाने याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी जर मनात आणले तर हे काम त्वरित सुरु होइल असे नागरिकांचे मत आहे."
.jpg)
0 टिप्पण्या