नवोदय शाळांपासुन गरजु विद्यार्थी वंचित लाभ गरिब हुशार विद्यार्थीना मिळत नसल्याची नागरीकांची ओरड.

 


ढाणकी -इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत हुशार मुलांना निवासी मोफत शिक्षण मिळावे या उद्देशाने शासनाने नवोदय विद्यालये स्थापन केली. या विद्यालयात शिकुन- विद्यार्थी मोठया पदावर जावुन देश सेवेलो कामी येईल हा उद्देश. मात्र ही योजना गरजु आणि हुशार विद्यार्थी पर्यंत पोहचत नसल्याचे काहीसे चित्र ग्रामिण भागात पहावयास मिळत आहे. नवोदय परिषामंध्ये ग्रामिण भागात ब-याच वेळा गोंधळ होत असुन परिक्षेदरम्यान उत्तरे सांगण्याचा प्रकार सुध्दा काही ठिकाणी होत असल्याचे पालक वर्गांचे म्हणने आहे. नवोदय परिक्षेच्या केंद्रावर शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणुन डयुटी असते.

अश्या वेळी नवोदयची शिकवणी घेणा-या खाजगी शिक्षकांचा कर्तव्यावरील शिक्षकांशी संबंध नवोदय असल्याने ते उत्तरे सांगुण त्या विद्यार्थना मदत करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या असल्या प्रकारामुळे गरिब व गरजु विद्यार्थी या शिकवणी वाल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडत असुन बहुतांश नवोदय ला लागणारे विद्यार्थी हे शिक्षक तसेच कर्मचारी वर्गाचे लागत आहेत. त्यामुळे शासनाच्या मुळ उद्देशाला फास बसत आहे.

तरी या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिका-यांना लक्ष देणे गरजेचे असुन असला प्रकार ज्या केंद्रावर होत आहे तिथे चौकशी करून दोषीवर कारवाई ची मागणी जोर धरत आहे. शासकिय नोकरीवाले पालक आपल्या पाल्याचे शिक्षण शुल्क भरूण करू शकतात मात्र सारख्या शासनाच्या संस्थामध्ये गैरमार्गाने आपले पाल्य टाकुन गरिब विर्द्यार्थ्यांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे येणा-या काही दिवसात जी काही नवोदय ची परिक्षा होईल त्यावर शिक्षण विभागाणे कटाक्षाने लक्ष ठेवुन परिक्षेतील हा गैरप्रकार थांबवायला हवा. तरी अशा प्रकारे गैरप्रकार करणा-या व्यक्तीवर कडक कारवाईची मागणी सुध्दा पालक वर्गातुन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या