प्रज्ञा शील समाधी चा मार्ग अवलंबून मानवाने मानवी दुःखातून मुक्त व्हावे. भदन्त पया बोधी

  

 ढाणकी प्रतिनिधी 

जगाला शांतीचा संदेश देणारे  प्रज्ञाचक्षु  भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती ची प्रतिष्ठापणा दिनांक 1 मे रोजी हरदडा येथे संपन्न झाली. शहरासह ग्रामीण भागात बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार व्हावा, बौद्ध धमाचा संदेश सर्वदूर पोहचावा, शील मार्ग सदाचरणाचा मार्ग, समाधी मार्ग, अवलंबून मानवी दुःखातून मुक्त होण्यासाठी सदैव प्रयत्न शिल राहावे हा उद्देश ठेऊन थायलंड येथून श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुस ता जिल्हा नांदेड संचालक भदन्त पय्या बौध्दि यांच्या माध्यमातून बौद्ध मूर्ती हरदडा येथील बौद्ध विहाराला मिळून दिली.

 बौद्ध विहारात स्थापन करण्यात आलेल्या बौद्ध मूर्तीचे लोकार्पण सोहळा डॉ प्राचार्य खेमधमो भन्ते आनंद बौध्दि,भदन्तश्रद्धां नंद भदन् शिलभद्र, भदन्त सूयेश, व इतर भिकुसंघ श्रामनेर संघ यांच्या उपस्थितीत भदन्त पय्या बौध्दि यांनी केले.

भगवान गौतम बौद्ध यांच्या मूर्ती प्रतिष्ठपणे नंतर भन्ते पय्या बौध्दि यांनी आपल्या मनोगतातून प्रत्येक मानवाने जीवनात एकवेळ श्रामनेर होऊन धम्माची दीक्षा घ्यावी श्रामनेर होऊ इच्छिणाऱ्या ने आमच्या खुरगाव नांदुस येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रात भेट द्यावी असे मनोगत व्यक्त करत भगवान गौतम बौद्ध यांचे विचार मांडले.

 बौद्ध मूर्ती प्रतिष्ठपणे नंतर सायंकाळी प्रा मोहन मोरे यांच्या अध्यक्ष ते खाली माजी आमदार विजयराव खडसे, यांनी विजयराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड, ढाणकी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल तुपेकर,संतोष जोगदंड,संबोधी गायकवाड नगरसेवक, परमेश्वर गोणारे, गौतम कांबळे, रवीचंद्र देशमुख, मधवदादा जमदाडे,आदित्य काळे सुनील कवडे, व्यंकटेश धुळे, दिपक वाघमारे, यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सायंकाळी भीम शाहीर आनंद कीर्तने आणि प्रबोधिनी साठे ह्यांचा बौद्ध भीम गीतांचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारत कांबळे, संभाजी कांबळे, प्रवेश कवडे आवृत्ती दै.विदर्भ केसरी यवतमाळ संपादक, माजी सरपंच रविंद्र दवणे,  सामाजिक कार्यकर्ता संभा कांबळे व हरदडा येथील नागरिकांनी मेहनत घेतली तर सूत्रसंचालन प्रणिता कांबळे यांनी केले व आभार विश्वजीत कवडे यांनी मानले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या