किडनी रोगाने ग्रासले जात आहेत चिंचोली ढाणकीचे नागरिक. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.


ढाणकी प्रतिनिधी 

ढाणकी पासून जवळ असलेल्या चिंचोली (ढा) ग्रामस्थांना किडनी रोगाच्या विविध आधाराने ग्रासलेले असून हा आजार नेमका कशामुळे  होत आहे  याचा आरोग्य विभागाने शोध घेने गरजेचे आहे.तीन हजार लोकवस्तीचे गावामध्ये दोन डझनच्या आसपास लोकांना  किडनीचा आजार जडलेला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरत असून हे कशामुळे होत आहे हे कळायला मार्ग नाही. चिंचोली  येथील बहुतांश लोक हे  गरीब व मजूरदार वर्ग आहे  कष्ट करून आपले पोट भरायचे हा त्याचा दिनक्रम. अशा मध्येच त्यांना किडनी रोगा सारख्या गंभीर आजाराचे निदान झाल्याने  त्यांच्या जगणे व मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या आजाराने फक्त वृद्धांनाच ग्रासले नसून तर त्यात महिला,  बालके व सर्वच वयोगटातील व्यक्ती आहेत. 

 किडनी म्हणजे शरीराचा मुख्य अंग, अशा या मुख्य अंगालाच  रोगाचे ग्रहण लागत असल्याने उपचार कसा घ्यायचा  आणि जीव कसा वाचवायचा हा मोठा प्रश्न चिंचोली वासियांच्या पुढे आ वासून उभा आहे. गेल्या काही वर्षापासून या रोगाचे सत्र सुरू असताना आरोग्य विभागाने गावात येऊन हे कशामुळे घडत आहे याचा शोध घेण्याची तसदी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती त्यामुळे या रोगाची साखळी आज वाढतच जात आहे. चिंचोली येथील बहुतांश वर्ग मजुरी करणारा असल्याने  या गंभीर आजारावर उपचार कसा घ्यावा?, उपचारासाठी पैसे कुठून आणावे?,उपचार घ्यावा की कुटुंबाची पोट भरावी  असे अनेकविध प्रश्न त्यांच्यापुढे आहे. निवडणुकीच्या काळामध्ये मतांचा जोगवा मांगायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींना हे असे प्रश्न दिसत नसतील का? की दिसत असले तरी  ते काना डोळा करतात  हे ईश्वरच जाणो. चिंचोली ढाणकी किडनी आजाराचे हे सत्र  आता सुरू झालेले असून  ते आपल्या जाळ्यात किती नागरिकांना ओढते हे येणारी वेळ सांगेल  तरी आरोग्य विभागाने या बाबीकडे गांभीर्याने बघून हे रोग होण्याचे कारणे शोधून त्यावर  उपाय शोधून काढायला हवा. जेणेकरून  या रोगाचे सत्र थांबायला मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या