ढाणकी शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच गोदावरी फाउंडेशन च्या वतीने वेगवेगळ्या दोन ठिकाणी महिला संमेलनाचे आयोजन.


ढाणकी प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ढाणकी शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.  काँग्रेसच्या वतीने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात तर गोदावरी समूहाच्या वतीने आर्य वैश्य मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन होते. जागतिक स्तरावर आठ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात येतो. आजची महिला ही पुरुषांच्या बरोबरीला असून  त्यांच्या खांद्याला खांदा लावून  पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात सुद्धा आपल्या कर्तुत्वाची छाप उमटवत आहे. त्यामुळे आजची नारी ही अबला नसून सबला आहे. तिच्यामध्ये दडलेल्या  कलागुणांनाही वाव मिळाला पाहिजे व त्याचा सन्मान झाला पाहिजे या हेतूने हे मेळावे आयोजित केले होते.  तसेच उद्योजक महिलांना बँक कर्जाविषयी मार्गदर्शन, बेरोजगार महिलांना विविध उद्योग विषयी मार्गदर्शन, मुलींची डान्स स्पर्धा, दहीहंडी कार्यक्रम  इत्यादी कार्यक्रमाचे काँग्रेसच्या वतीने  तर गोदावरी समूहाच्या  वतीने वक्तृत्व स्पर्धा, रंगोली स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, इत्यादी महिलांसाठीच्या  कार्यक्रमाचे नियोजन होते.एकाच दिवशी आणि एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिला मेळाव्याचे आयोजन असल्याने प्रमुख पाहुण्यांची चांगली दमछाक झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या