ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी गांजेगाव व ढाणकी सावळेश्वर रस्त्याचे काम अभियंता यांचे दुर्लक्षतेमुळे दर्जाहीन होत आहे. सविस्तर वृत्त असे, ढाणकी गांजेगव व ढाणकी सावळेश्वर रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये मा.स्व. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांनाच घेण्यात आले होते सदर काम जेष्ठतेनुसार व मा.खाजदार श्री हेमंत पाटील यांचे पाठपुराव्याने या कामाची निवीदा प्रक्रीय होऊन कामास सुरुवात झाली. या कामाची किंमत रु. ७८७.९५ लक्ष असून काम पुर्णत्वाचा दिनांक ०३/०३/२०२३ असा आहे. परंतु मार्च २०२३ काम पुर्ण करच्याची मुदत संपत असून सुध्दा ३० टक्के सुध्दा काम झाले नाही. झालेले कामामध्ये रस्ता सरळीकरण करणे मुरुम गीट्टी टाकुन त्याची दबाई करणे साईड पट्टया भरुन त्यावर पाणी टाकून दबाई करणे असे दर्जेदार काम झाले नाही. जर करीता या कामावर देखरेख करणारे अभियंता यांनी वेळोवेळी देखरेख केली असती तर कदाचीत हे काम दर्जेदार झाले असते. परंतु कंत्राटदार व अभियंता यांचे संगनमत असल्यामुळेच असे काम करण्यात येत असल्याचे जनतेमध्ये बोलल्या जात आहे? या कामाचे विलंब लागण्याचे कारण म्हणजे कंत्राटदाराने तांत्रिक अडचणी दाखवून काम उशिरा सुरु केले यामध्ये असे की, मुदत संपल्यानंतर मुदत वाढवून घेण्याबाबत तांत्रीक कारणे दाखवून शासनाची दिशाभुल करणे व वाढीव दराने पैसाची मागणी करणे असे कार्यक्रम प्रशासकिय अधिकाऱ्यांचे सहकार्यानेच घडू शकते ?
ढाणकी हे गांव ३५००० लोकसंख्येचे वर असून तालुका दर्जाचे आहे शिवाय शेजारी २५ - ३० खेडी गावाला जोडलेली आहे. त्यामुळे येथील बाजारपेठ मोठी आहे. खेड्यातील नागरिकांना शेतकरी, शाळकरी मुले-मुली, दळणवळण व इतर आवश्यक कामाकरीता ढाणकीलाच यावे लागते त्यामुळे येथे नेहमी वर्दळ सुरु असते. शेजारी १८ किमी वर हिमायतनगर आहे व येथून रेल्वे लाईन असल्यामुळे बासर, नांदेड, हैदराबाद, तिरुपती बालाजी व यापुढे जाण्याकरीता सर्व जनतेचे सोईचे आहे. जनतेची गैरसोय दूर व्हावी म्हणून या रस्त्याचे कामास मंजुरी देऊन सुरु करण्यात आली. परंतु कंत्राटदार व अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे या रस्त्याचे बांधकाम मुदतीत पुर्ण होणे शक्य नाही असे दिसते? त्यामुळे जनतेत संताप व्यक्त केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. वेळीच दखल न घेतल्यास जनता आदोलन करण्याच्या मार्गावर असल्याचे कळते?

0 टिप्पण्या