ढाणकी प्रतिनिधी -
ढाणकी परिसरामध्ये बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असून त्याने मजल आता शहरापर्यंत मारली आहे. शहरातील शिक्षक कॉलनी च्या जवळील दत्तात्रय नारायण योगेवार यांच्या शेतात बांधून असलेल्या कालवड वर रात्री बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. ढाणकी शहरात ही घटना घडल्यामुळे शिक्षक कॉलनी येथे दहशतीचे वातावरण आहे. काही दिवसापूर्वीच ढाणकी लगतच्या मेट येथे सुद्धा बिबट्याने धुमाकूळ घातला होता. मेट पासून आता ढाणकी शहरात बिबट्या आल्याने परिसरातील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन शेतात जागलीला जात आहेत.
बिबट हा प्राणी जंगलापेक्षा गावालगतच च्या शेतात त्याचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. कारण त्याला विना जास्त मेहनत करता सहज शिकार ही गावालागत उपलब्ध होते. त्यामुळे त्याची पसंतीची ठिकाणे गावात लगतची शेती ही आहे.
आजपर्यंत ढाणकी परिसरात बिबट्या धुमाकूळ घालत होता. मात्र त्याने थेट आता ढाणकी शहरावरच आपले सावध साजल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून सतर्कताच हा यावर उपाय आहे.
आपली पाळीव जनावरे गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधावी, शक्य असल्यास शेतात एकटे जाणे टाळावे. वन विभागामार्फत काही ठिकाणी आम्ही ट्रॅप कॅमेरे बसवणार असून त्यामुळे आम्हाला बिबट्याचा वावर नेमका कुठे आहे ते कळेल आणि खबरदारी घेता येईल.
सुदर्शन पांडे,
वनपरीक्षेत्र अधिकारी
प्रादेशिक उमरखेड

0 टिप्पण्या