कॅन्सर पीडित विहर्ष च्या मदतीसाठी धावली गांजेगांव येथील तरुनाई. लोकवर्गणी उपचारासाठी देऊन साजरी केली आदर्श शिवजयंती.


 ढाणकी प्रतिनिधी

ढाणकी पासून जवळच असलेल्या गांजेगाव येथील युवकांनी  शिवजयंती  बँड,डीजे व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवर  अनाठाई खर्च न करता  गांजेगाव येथीलच तीन वर्षीय चिमुकला विहर्ष आशिष खिरे  या ला  कॅन्सरच्या उपसारासाठी  तीस हजार रुपये लोक वर्गणीतून जमा करून  शिवरायांना आगळे वेगळे अभिवादन केले. यामुळे गांजेगावा तील युवकांचा तसेच नागरिकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 सामान्य कुटुंबात जन्मलेल्या विहर्षाला कोवळ्या वयातच कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. खेळण्याबागडण्याच्या या वयामध्ये  त्याला हैदराबाद येथे दवाखान्यात उपचारासाठी  कुटुंबियांनी दाखल केले, घरची परिस्थिती सर्वसामान्य  त्यामुळे उपचारासाठी खर्च करणे  कुटुंबांना  मोठे जिकरीची जात होते. कुटुंबाची ही  स्थिती पाहून गावातील युवकांनी व नागरिकांनी  यावर्षी शिवजयंती उत्साहात साजरी न करता लोकवर्गणी  करून  विहर्षच्या उपचारासाठी जमा झालेले पैसे   त्याच्या कुटुंब यांना देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला.

 आजचा युवक हा मोबाईल मुळे  भावना शून्य  होत असल्याची ओरड एकीकडे होत असताना  गांजेगाव येथील युवकांनी  विहर्ष ला केलेली ही मदत विहर्षसाठी  प्रेमाचा ओलावा ठरला आहे आणि हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली  स्वराज्यातील युवा पिढी आहे. अडचणीच्या काळामध्ये खिरे कुटुंबीयांना  गांजे गावातील युवक व नागरिकांनी  ही दिलेली आर्थिक मदत  विहर्षासाठी  संजीवनी ठरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या