ढाणकी प्रतिनिधी -
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे आज ढाणखी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आसमानी आणि सुलतानी संकटाशी बळीराजा दोन हात करत असून त्याच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे पिचलेल्या शेतकऱ्यापुढे आत्महत्या शिवाय पर्याय नसतो. शेतकऱ्याच्या मालाला जर योग्य हमीभाव मिळाला तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही.
मात्र सत्तेवर असलेले सरकार हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असून यामुळे शेतकऱ्यांची स्थिती ही दयनीय होत आहे. मोठ्या मेहनतीने आपल्या लेकरासारखा वाढवलेल्या पिकाला बाजारपेठेत योग्य मोबदला मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली. कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये हमीभाव, सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार रुपये, तूर व चन्या sathi🙏🏻नाफेड केंद्र चालू करणे, व पीक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी या मागण्या करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
संजय कुंभरवार, रमेश गायकवाड, प्रशांत जोशी, सचिन साखरे, शिवाजी फाळके, कांता वासमवार, गणेश नरवाडे, अमोल अरमाळकर, रमेश पराते, गजानन गायकवाड, ऐजाज पटेल, संभाजी गोरटकर, विशाल नरवाडे, रमेश होले, गजानन अजेगावकर, अशोक कोरटवाड, शैलेश करकले, बालाजी येरावार, पिंटू सुरोशे, अभय सोनोने, गजानन जाधव, अविनाश नाईकवाडे, बजरंग ठाकूर, गजानन धोपटे, विजय ठाकूर, युवराज कलाने, रमेश कदम, साहेबराव शिंदे, नागेश कानिदे, अनिल गायकवाड, दिलीप जाधव, दिगंबर मस्के, अनिल तोडक, जांभुळकर, बंटी जाधव इत्यादी शिवसेना , युवासेने चे पदाधिकारी उपस्थित होते. तब्बल एक तास हा चक्काजाम चालला. शिवसेनेच्या या चक्काजाम मुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

0 टिप्पण्या