म्हशीवर कोसळली वीज. निंगनूर येथील घटना.


ढाणकी प्रतिनिधी 

 बदललेल्या हवामानामुळे निंगनूर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावत विजेच्या कडकडाटासह मध्यरात्री 2 वाजताचे सुमारास पाऊस पडला . निंगनूर शिवारातील रविंद्र पंडागळे यांच्या शेतात बांधलेल्या अंदाजे 7 वर्ष वय असलेल्या सुमारे 70 ते 80 हजार रुपये किंमतीच्या मुर्रा म्हशीवर वीज कोसळल्याने गाभन ( गर्भवती ) म्हैस जागीच गतप्राण झाली. सकाळी नेहमी प्रमाणे शेतात गेला आसता रात्रीच्या सुमारास झालेली विजेचा कडकडाटातील वीज आपल्याच शेतात पडल्याचे दिसताच शेतकरी कोलमडून गेला शेतीला जोड धंदा म्हणून घेतलेल्या म्हशीवर वीज कोसळ्याने जागेवरच गत प्राण झाली होती वीज कोसळल्याची माहिती गावात होताच मोठ्या प्रमाणात गावकरी घटना स्थळी जमले वीज कोसळल्याची माहिती तलाठी यांना मिळताच त्यांनी पशु संवर्धन अधिकारी यांना सोबत घेत  सदर घटनेचा पंचनामा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या