ढाणकी येथे भीषण अपघात, भरधाव ट्रॅक्टरने 3 जणांना उडविले.




ढाणकी प्रतिनिधी -

 राज्यात महामार्गाचे काम धडक्यात सुरु असून तासाचा प्रवास मिनिटावर आल्याने वेळेची बचत तर झाली मात्र वाहनधारकांच्या वाहनाचा वेग वाढल्याने अपघातांची शृंखला निर्माण झाली. गुळगुळीत रस्ते असल्याने वाहनधारकांना आपले वाहन पळवण्याचा मोह आवरनसा झाला मात्र त्यामुळे निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमावण्याची वेळ आली.

 ढाणकी शहरातून गेलेल्या औरंगाबाद माहूर महामार्गावर  अपघाताची मालिका सुरूच असून शहरानजीक फुलसावंगी फाटा येथे आज सायंकाळी अंदाजे सातच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टर चालकाने तीन पादचाऱ्यांना उडवले. अपघाताची माहिती मिळताच बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. बातमी लिहीपर्यंत जखमीची व ट्रॅक्टर चालकाचे नाव कळाले नव्हते.

ढाणकी शहरातील काही नागरिक फिरण्यासाठी गेलेले  तर काही कामावरून घरी परतत फुलसावंगी कडून  सुसाट वेगाने शहराकडे येणाऱ्या ट्रॅक्टरने तीन जणांना जोरदार धडक दिली. या तीन जणांची ही प्रकृती गंभीर असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे उपचारासाठी दाखल केल्या आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची परिस्थिती पाहून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले.  पुढील तपास पोलीस स्टेशन करत आहे. रूग्णालयात आमदार नामदेव ससाने यांनी जखमींची भेट घेतली व जखमींना धीर दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या