ढाणकी प्रतिनिधी -
गेल्या चार ते पाच दिवसापासून रात्री बेरात्री अचनाक इमरजेन्सी लोडशेडींगच्या नावाखाली ग्रामीण भागातील लाईट बंद करण्यात येत आहे.
सध्या विद्यार्थ्याच्या वार्षीक व नवोदय परिक्षा सुरू आहेत रात्री बे रात्री अचानक लोडशेडींग घेत असल्यामुळे विध्यार्थी च्या अभ्यासावर परिणाम होत आहे. त्यातच उन्हाचा पारा चढल्यामुळे लहान मुले, वृध्द यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. मजुर व शेतकरी दिवसभर शेतात राबतात आणि सांयकाळी घरी आल्यानंतर घरकाम, स्वयंपाक करायचे म्हटले तर लाईट नसते त्यामुळे लाईन येण्याचा वेळ कधी ९, तर कधी १०, तर कधी ११ त्यामुळे स्वयंपाक कधी करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामिण भागातील नागरिकांच्या दिनचर्यमध्ये विपरीत परिणाम होवुन आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच बंदीभागातील जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला असून जंगलातील हिंस्त्र प्राणी गावात येण्याचे प्रमाण वाढले आहे रात्री लाईट नसल्यामुळे जर काही जीवीतहाणी झाल्यास महावितरण कंपनी जबाबदारी घेईल का असा प्रश्न भाजपा जिल्हाउपाध्यक्ष विक्रम राठोड यांनी महावितरणचे, सहाय्यक अभियंता वाघमारे, कनिष्ठ अभियंता योगेश ठाकरे, यांना विचारला . तरी भारनियमन बंद झाले नसल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा सुद्धा या वेळी इशारा देण्यात आला.यावेळी वीरेंद्र राठोड, सचिन राठोड, अनिल राठोड, संबोधी गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.

0 टिप्पण्या