ढाणकी प्रतिनिधि
ढाणकी - बिटरगाव रस्त्यातील खड्यामुळे काल गर्भवती महिला व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यु झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा मृत्यु रस्त्यातिल खडयांमुळे पर्यायाने प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे झाल्याने या प्रकारणाची सखोल चौकशी करुण दोषी अधिकाऱ्यां वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ढाणकी शहर भाजपच्या वतीने करण्यात आली.
ढाणकी बिटरगाव रस्त्याची अवस्था प्रचंड दयनीय आहे. या रस्त्यासाठी नुकतेच आंदोलन देखील झाले होते, त्यावेळी प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, मात्र ते हवेतच विरले. अधिकाऱ्यांनी हलगर्जी केली ज्यामुळे काल मन्याळी येथील नताशा ढोके नामक महिला व तिच्या गर्भातिल बाळाचा उपचारासाठी ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणताना गाड़ी खड्यात आदळल्याने मृत्यु झाला. हा प्रकार प्रसार माध्यमातून समोर येताच समाजमन प्रचंड हळहळले. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. हा बळी रस्त्याने पर्यायाने प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेला, त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर रस्ता पूर्ण का झाला नाही, यास कोन जबाबदार ? ह्या सर्व बाबींचा तपास करुण दोषी अधिकार्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.

0 टिप्पण्या