उमरखेड उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- प्रहार नादुरुस्त रस्त्यांमुळे बाळ व बाळंतिणीचा दुर्दैवी अंत.

 


प्रतिनिधी उमरखेड :-

 तालुक्यातील ढाणकी ते बिटरगाव या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने पायी चालणे सुद्धा अवघड झाले असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताची  वाढ झाली असून मागील वर्षभरापासून पाच ते सहा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा मृत्यू सुद्धा या अपघातात झालेला आहे.

           या जीवघेण्या रस्त्याबाबत चे नुतनीकरण ,डांबरीकरण करण्याकरिता या भागातील नागरिकांनी ,पत्रकार बांधवांनी निवेदन देऊन सदर रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी घेऊन अनेक आंदोलने सुद्धा केली .परंतु उमरखेड उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड हे बघ्याची भूमिका घेत सदर रस्त्याकडे  दुर्लक्ष करत निवेदन व आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल अभियंत्याकडून घेतल्या गेली नाही. 

            अभियंत्याच्या दुर्लक्षित पणामुळे काल दिनांक 11/4/2022 रोजी सौ. तमाशा अविनाश ठोके वय 30 रा. हिंगोली ही बंदी भागातील मन्याळी येथील वसंतराव नरवाडे यांची कन्या तमाशा हिंगोली येथे अविनाश ठोके यांच्याशी विवाह झाला होता. प्रस्तुती साठी तनाशा माहेरी आली होती. रविवारी तिला असह्य प्रसूती वेदना सुरू झाल्या त्यामुळे आजी ,आई व भाऊजी सोबत एका वाहनातून ढानकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जात होते .

         सायंकाळच्या सुमारास सर्व जण वाहनातून तिकडे निघाले मात्र खड्डेमय रस्त्यांमुळे त्यांना प्रचंड त्रास झाला असून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर चिंचोली फाट्याजवळ धक्के बसून मधेच तीची प्रस्तुती झाली मात्र खड्डेमय रस्त्यांच्या धक्क्यामुळे काही क्षणातच नवजात बाळ दगावले त्यानंतर काही वेळातच तनाशानेही जगाचा निरोप घेतला.

     ही घटना न रास्ता झालेली असलेल्या रस्त्यांमुळे ती वेळेवर आरोग्य केंद्र पर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे या घडलेल्या घटनेला या रस्त्याच्या अति गांभीर्य अशा विषयाकडे उपविभागीय अभियंता यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना या घटनेच्या दोषी ठरवून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्वरीत या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करून या नंतर अशा घटना होऊ नये व निष्पाप नागरिकांचा बळी जाऊ नये याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे .

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने या निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सय्यद माजीद, उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितेवार, तालुका संपर्कप्रमुख अंकुश पानपट्टे, शहर संघटक मनोज वानखडे ,शहर कोषाध्यक्ष अभिजीत गंधेवार, प्रसिद्धी प्रमुख विवेक जळके व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या