ढाणकी नगरपंचायतीला वाली कोण? कायम मुख्याधिकारी कधी लाभणार?


 ढाणकी प्रतिनिधी 

 ढाणकी नगरपंचायत स्थापन झाल्या पासून नगरपंचायत प्रभारावर चालविल्या जात आहे.  ढाणकी नगरपंचायतीला कायम मुख्याधिकारी म्हणून आकाश सुरडकर मिळाले होते मात्र अवघ्या एका वर्षात त्यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली तेव्हा पासून ढाणकी नगरपंचायत प्रभार उमरखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी घेतला होता.  परंतु त्यांची बदली झाल्याने ढाणकी नगरपंचायतीला मुख्याधिकारी मिळणे क्रम प्राप्त होते मात्र अद्यापही कायम मुख्याधिकारी न लाभल्याने नागरिकांना कामामध्ये अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे नगरपंचायत कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहे.

 त्यामुळे शहरातील शासकीय कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत त्याच प्रमाणे त्याकामावरनागरपंचायत प्रशासन चालवणाऱ्या कर्मचाऱ्यावर सुद्धा कोणाचाही वचक राहिला नाही.

 शहरात महिन्यातून दोन वेळ नळाला पाणी येत आहे त्यामुळे नागरिकाला पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. किंवा डोक्यावर हांडा घेऊन शेतशिवारातून पाणी आणावे लागत आहे.

 पैनगंगा नदी पात्रातून ढाणकी नगरीला पाणी पुरवठा करण्या करीता लाखो रुपये शासनाने खर्च केलेले आहेत नदी पात्रात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही फक्त मुख्याधिकारी उपलब्ध नसल्या कारणाने नागरिकाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

 ढाणकी ग्रामपंचायत असते वेळी सुद्धा प्रभारी चे ग्रहण होते नगरपंचायत झाल्याने तरी प्रभारीचे ग्रहण सुटेल असे नागरिकांना वाटत होते मात्र येथे उलटेच होतांना दिसून येत आहे.  आठ दिवसा पासून नगरपंचायत वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या