ढाणकी प्रतिनिधी -
ढाणकी येथील अरफान खान फेरोज खान पठाण या 7 वर्षीय चिमुकल्याने रोजा ठेवला आहे. रमजान महिना मुस्लिम धर्मामध्ये पवित्र समजला जातो मन आणि शरीर शुद्ध करण्याचा एक मार्ग म्हणून रोजे ठेवले जातात. येथील अफरान खान पठाण या चिमुकल्याने रोजा धरला आहे. त्याने अल्लाहकडे समस्त मानव जातीच्या कल्यानाची व समाजात एकोपा टिकून राहण्याची प्रार्थना केली आहे. उन्हाळ्याच्या कठीण दिवसांमध्ये चिंतामुक्त ठेवण्याचे काम उपवास (रोजा ) करीत आहे. दिवसभर काहीही न खाता आणि पाणी सुद्धा प्राशन न करता चिमुकल्याने रोजा ठेवला आहे. उन्हाळ्यात असे उपवास करणे कठीण असतांनाही अफरान ने रोजा धरला आहे.

0 टिप्पण्या