ढाणकी प्रतिनिधी -
ढाणकी पासून जवळच असलेल्या बिटरगाव बु येथे 12 वर्षांची चिमुकली पाणीपुरी खाण्यासाठी जात असताना आरोपी शेख अफरोज शेख फकीरा वय 24 वर्ष
यांनी तिला पुड्या आणण्यासाठी शंभर रुपये देतो म्हणून जवळील शेतात नेऊन वाईट उद्देशाने स्पर्श केला व कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने घर गाठून सदर घटना पालकांच्या कानावर टाकली. मुलीच्या पालकांनी ताबडतोब बिटरगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपी शेख अफरोज विरुद्ध तक्रार नोंदविली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप बोस यांच्या मार्गदर्शना मध्ये अप नंबर 106/2022 कलम 354(अ) (ब) 323, 506 भादवी सह कलम 8 पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार प्रताप बोस करत आहेत.
.jpeg)
0 टिप्पण्या