ढाणकी प्रतिनिधी -
ढाणकी येथे महावितरण उपविभाग च्या वतीने कृषी वीज देयक ग्राहकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उपविभागातील थकीत विज बिल ग्राहकांनी या मेळाव्याला उपस्थित राहून आपली थकबाकी भरून महावितरणला सहकार्य केले.
यावेळी सुहास रंगारी, प्रादेशिक संचालक महावितरण नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पुष्पा चव्हाण,मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ अमरावती, सुरेश मडावी अधीक्षक अभियंता महावितरण यवतमाळ, सहारे अधिक्षक अभियंता नागपुर, संजय श्रावण आडे कार्यकारी अभियंता महावितरण पुसद,ढाणकी चे नगराध्यक्ष श्री सुरेश जयस्वाल, उपाध्यक्ष शेख जहीर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी भरलेल्या कृषी पंपाच्या वीज बिलातून ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत स्तरावर विजेच्या पायाभूत सुविधांसाठी,३३ टक्के रक्कम जिल्हा स्तरावरील विजेच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार असून,शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ठिकाणी विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहेत. त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात शेतीसाठी दिवसा वीजेची समस्या सोडवण्यास मदत होईल,यासाठी जास्तीत जास्त कृषी वीज ग्राहकांनी व्याज आणि विलंब माफीची ही संधी दडवू नये. ३१ मार्च २०२२ पर्यंत कृषी पंपाचे वीज बिल कोरे करून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी बोलताना सुहास रंगारी, प्रादेशिक संचालक महावितरण नागपुर यांनी केले.
यावेळी कृषी वीज धोरण २०२० मध्ये एकूण ११७ शेतकऱ्यांनी भाग घेऊन ५१.३० लक्ष रुपयांचा भरणा करुन आपले विज बिल निरंक केले. त्या सर्व सन्माननीय शेतकरी बांधवांचा महावितरणच्या वतीने गौरव करण्यात आला.या मेळाव्याचे महावितरण उपविभाग ढाणकी च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. उपकार्यकारी अभियंता पी.व्ही. वाघमारे, सहाय्यक अभियंता योगेश मारोतराव ठाकरे ढाणकी ,कनिष्ठ अभियंता ए.बी. चव्हाण बिटरगाव ,कनिष्ठ अभियंता एस. डब्ल्यू. गेडाम साखरा तसेच उपविभागातील सर्व तांत्रिक कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली. शेती साठी पुरवठा घेतल्यापासून कायमच थकबाकी मुक्त राहणारे बिटरगाव येथील शेतकरी डी. एस. कांबळे यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाषबाबु कुचेरीया, नितीन येरावार, वसंतराव फुलकौंडवार, बाबूराव नरवाडे , चंद्रभान बाभळे, उपविभागातील सर्व कर्मचारी,कार्यालयीन कर्मचारी, कंत्राटदार बांधव, सुरक्षा रक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रधान यंत्रचालक प्रभाकर दिघेवार यांनी केले .अल्पोपहार व चहापाण्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

0 टिप्पण्या