ढाणकी प्रतिनिधी -
उन्हाळ्याची चाहूल लागत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाची वाट धरत असून त्यामुळे खरुस परिसरामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.
काल संध्याकाळी च्या सुमारास खरुस शिवारातील दिगंबर तुपेकर यांच्या शेतातील गायीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केल्याने तूपेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
खरूस परिसरामध्ये बिबट्याचे वारंवार हल्ले होत असून यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधी सुद्धा बिबट्याने गाई वर हल्ला करून गाईला ठार केले होते. गोठ्यातील जनावरांवर बिबट्याचा होणारा हा हल्ला तीन ते चार वेळेस झाला असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जागलीला सुद्धा जाण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे.
तुपेकर यांच्या गाईचा उशिरापर्यंत पंचनामा झाला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त होती. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
0 टिप्पण्या