ब्राम्हणगाव प्रतिनिधी -संदीप पेंटेवाड
ब्रम्हाणगाव येथील तेजमल गांधी विद्यालयात आठ जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ डॉ. भास्करराव दवणे सर यांनी श्री तेजमल गांधी कृषी विद्यालय, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा व्यावसायिक अभ्यासक्रम ब्राम्हणगाव येथे भेट दिली. आणि आपले शालेय मित्र सन्माननीय प्रकाशजी पेंटेवाड यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल व पुष्पहार देऊन त्यांचे अभिनंदन केले.
विद्यालयाच्या वतीने प्राचार्य पेंटेवाड व सुधाकरराव वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ.भास्कर दवणे यांचे स्वागत केले .
डॉ. दवणे साहे श्री तेजमल गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी असतानाच्या अनेक गोष्टी विद्यार्थ्यांसमोर विषद केल्या. मार्गदर्शन करतांना सांगितले की तुम्ही अभ्यासात सातत्य ठेऊन जर ज्ञान मिळवले तर निश्चित जीवनात यशस्वी व्हाल तसेच जर कोणाला शैक्षणिक बाबतीत काही अडचण निर्माण झालीच तर माझ्याशी संपर्क करा ती अडचण दूर करण्यासाठी मी कटिबद्ध असेल.
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपण विद्यालयात आलात व विद्यार्थी आणि आम्हा शिक्षकांना मार्गदर्शन केले ते निश्चितच आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं सन्माननीय सुधाकरराव वानखेडे यांनी सांगितलं.
प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.दवणे साहेब यांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना सन्माननीय प्रकाश पेंटेवाड सर भाऊक झाले त्यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील परिस्थितीची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली व डॉ.भास्कर दवणे यांनी विद्यालयात येऊन सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या