दर्पणदिनी पत्रकारांचा सन्मान. कर्तव्यपार पाडताना सजगता ठेवा- बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस.

 


ढाणकी प्रतिनीधी-

पत्रकारांनी संवेदनशिलता आपल्या कसोटीवर घासुन पाहावी .कठिण परिस्थीतीतही आपल्या लेखनिची धार सदैव तळपत ठेवावी , कर्तव्य पार पाडताना आव्हाने कोणतीही असोत बेडरबाणा कायम ठेवुन निपक्षपणे सोषित, पिडीत, वंचित समाजाप्रती निष्ठा आणि जिव्हाळा कायमस्वरूपी ठेवावा असे प्रतिपादन बिटरगावं पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांनी 6 जानेवारी रोजी भोसले वाडयावर गांधी गांजेगाव रोड आयोजित दर्पणदिनी ढाणकी शहरपत्रकार संघाचा सन्मान करून नविन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय भोसले होते. तर प्रमुख उपस्थितीत बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष कैलास घुगरे, सचिव स्वप्निल चिकाटे, विनोद गायकवाड, कोशाध्यक्ष शैख फयाज, सहसचिव गजानन गंजेवाड, संघटक उदय पुंडे,, विकासदादा चापके, राहुल चौरे, ब्रम्हानंद मुनेष्वर, नागेष महाजन, मोहन कळमकर, शेख आसिफ, शेख इरफान, संजय सल्लेवाड, पंजाब कदम, अनिल राठोड, इत्यादी पत्रकार संघातील सदस्य उपस्थित होते. 

पुढे बोलताना ठाणेदार म्हणाले की, पत्रकार संघाने मराठी पत्रकारीतेची जबाबदारी पार पाडताना, अनेक सामजिक आणि लोकहिताच्या कार्यातही पुढाकार घेवुन आपल्या कार्याचा ठसा उमटविला. हे कार्य कौतुकास्पद आहे. 

यावेळी पत्रकार संघाचे प्रषांत जोषी, नागेश महाजन, यांनी पत्रकारांच्या व्यथा आणि वेदनावर हळुवार फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी कितीही प्रामाणिक सेवा केली तरिही समाजाकडुन कधिच त्यांच्या पाठिवर षाबासकीची थाप मारण्यासाठी कोणीही पुढे येत नाही हे पत्रकारांचे दुर्देव म्हणावे का? अषी खंत व्यक्त केली. सुत्रसंचालन कैलास घुगरे यांनी तर आभार संजय भोसले यंानी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या