सोयाबीनचा ढग झाकतांना तरूण शेतकऱ्यांचा विहीरीत पडून मृत्यू.

 


  दाऊ गाडगेवाड हिमायतनगर

            तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला असुन यामुळे शेतकरी हतबल बनला आहे.शनिवारी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामध्ये शेतातील काढलेल्या सोयाबीन चा ढग झाकण्यासाठी गेलेल्या पिचोंडी  येथील तरूण शेतकऱ्यांचा ढगाजवळील विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. 

      हिमायतनगर तालुक्यातील पिचोंडी येथील शेतकरी नागनाथ धनवे वय(२२) यांच्या शेतातील दोन दिवसापासून सोयाबीन काढून ढग हा विहीरी जवळ लावण्यात आला होता. 

                     शनिवारी दुपारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला शेतात ढग झाकण्यासाठी कोणी च नसल्याने घाईगडबडीत ढग झाकतांना सदरील तरुण शेतकऱ्यांचा ढगावरून तोल विहीरीकडे गेला तुडुंब भरलेल्या विहीरीत पडल्याने शनिवारी रात्रभर कुटुंबियांनी शिवारात वडिलांनी शोधाशोध केली . परंतु मुलगा सापडला नाही रविवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान गावातील नागरीकांनी व ढगाजवळील विहीरीत गळ टाकून पाहिले असता तरूण शेतकऱ्यांचे प्रेत हाती आले आहे. सदरील घटना पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला सदरील घटनेची माहिती मयताच्या भावांनी पोलीसांत दिली आहे. बेमोसमी मुसळधार पावसामुळे तरूण शेतकऱ्यांला जिव गमवावा लागला आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या पावसामुळे शेतकरी हतबल बनला आहे.  या तरुण शेतकऱ्यांच्या दुर्दैवी घटनेने पिचोंडी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली आहे. सदरील शेतकऱ्यांचे प्रेत हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री ७ वाजेपर्यंत श्वेच्छदन झाले नसल्यामुळे अंत्यविधी झाला नसल्याची माहिती उपसरपंच रोशन धनवे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या