लखिमपुर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या हिमायतनगर शहर बंद.

 


दाऊ गाडगेवाड हिमायतनगर

उत्तर प्रदेशातील लखिमपुर खेरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात  आले आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या घटनेचा निषेध म्हणुन दि. ११/१०/२०२१ रोजी सोमवारला  महाविकास आघाडी  सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.  तरी हिमायतनगर येथील व्यापारी वर्गाने शेतकऱ्यांच्या समर्थनात दिवसभर बाजारपेठ बंद ठेऊन सहकार्य करावे असे  निवेदन महाविकास आघाडी च्या वतीने पोलीस प्रशासनला देण्यात आले आहे यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, शहराध्यक्ष संजय माने, उदय देशपांडे, प्रकाश रामदीनवार व अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या