जिल्हाधिकारी यांनी सनियंत्रण समितीची बैठक घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना न्याय द्यावा- भागवत देवसरकर

 


दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीनंतर पिकविमा कंपनीने हरकती घेतल्यानंतर जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक मा.जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित करून या संदर्भात सर्व दावा,हरकती निकालात काढून फेटाळून लावून तसा अवहाल मा.कृषि आयुक्त पुणे यांना पाठवावा लागतो.नांदेडच्या मा. जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक आयोजित केली नाही, जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत पिक विमा कंपनीचा हरकत फेटाळून लावून तसा अहवाल मा.आयुक्त कृषी पुणे यांना पाठवावा लागतो, त्यानंतर मा.आयुक्त कृषी पुणे  विमा कंपनीला 25 टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश देतात,नांदेडच्या मा. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक न घेतल्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी 25 टक्के आगाऊ पीकविमा पासून वंचित राहण्याची शक्यता आहे, मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी तात्काळ पिक विमा योजना सनियंत्रण  समितीची जिल्हास्तरीय बैठक घेऊन पिकविमा कंपनीची हरकत फेटाळून नुकसानीचा अहवाल मा.आयुक्त कृषी पुणे यांच्याकडे त्वरित पाठवावा. नांदेडच्या मा. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी तत्पर राहत,त्यांचा स्तरावर शेतकऱ्यांचे कुठलाही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची काळजी घ्यावी.

नांदेडच्या मा.जिल्हाधिकाऱ्यांकडून पीकविम्याच्या किती हरकती निकाली काढायच्या बाकी आहेत,अद्याप त्या का काढल्या नाहीत, तसेच महसूल विभागात कामचुकारपणा कोणी केला,या हरकती निकाली काढल्या नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला नाही का, त्याला जबाबदार कोण? शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम व्हायला हवे,पण यात चालढकल कोण करतय,याचा शोध घेणे गरजेचे आहे,नांदेड जिल्ह्याच नाव आज ॲग्रोवन दैनिकात वाचलं, सर्वाधिक पिंकाच नुकसान झालेल्या जिल्हा मागे राहिला म्हणजे जिल्ह्याची एक प्रकारे नामुश्की आहे, कारण मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातच पिकांचे झालेले आहे,सर्वाधिक बाधित शेतकरी व सर्वाधिक पिक विमा काढणारे शेतकरी सुद्धा नांदेड जिल्ह्यातील आहेत, सर्वच राजकारणी तर देगलूर पोटनिवडणुकीत व्यस्त आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुठे वेळ आहे, जिल्ह्याच्या सत्ताधारी पक्षाने महसूल प्रशासनावर अंकुश ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश मा. पालकमंत्री साहेबांनी मा. जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत हीच एक माफक शेतकरी पुत्र म्हणून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांची अपेक्षा..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या