लखिमपुर खिरी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याची घटना म्हणजे जनरल डायरची मानसिकता - सुनिल पतंगे बंदला मिळाला तालुक्यात समिश्र प्रतिसाद.


दाऊ गाडगेवाड हिमायतनगर

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथील आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्र्याच्या  मुलाने  अंगावर गाडी घालून ठार मारले. या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्वच स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर भाजपाच्या केंद्र सरकार कडून व भाजपा शासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे. 

          भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीलाही लाजवेल अशा प्रकारचे असून लखीमपुर खीरी येथील शेतकऱ्यांना सामूहिकरीत्या ठार मारण्याची घटना जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडाची आठवण करून देणारी आहे.


          अशा या क्रूर,अत्याचारी भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील महाराष्ट्र बंद चे आवाहन केले  त्या अनुषंगाने हिमायतनगर तालुका बंद पाळण्यात आला.  तालुक्यातून या बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटिल देवसरकर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, मा. जी.प. सदस्य सुभाष राठोड, बँक संचालक गणेश शिंदे, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान, नगराध्यक्ष कुणाल राठोड, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, राष्ट्रवादी शहराध्यक्ष उदय देशपांडे, शिवसेना शहरप्रमुख प्रकाश रामदिवार, नगरसेवक सावन डाके, एकनाथ पाटील, विठ्ठल पिनलवाड, सुमेध भरणे, आकाश सूर्यवंशी, फेरोज कुरेशी, अब्दुल बाकी, सखाराम देवकाते, यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या