ढाणकी प्रतिनिधी
बामसेफ प्रणित बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्वारा महाराष्ट्रातील 36 जिल्हे व 358 तालुक्यामध्ये गावोगावी जाऊन धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त धम्मा विजय रॅली प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने ढाणकी येथे सुद्धा आयोजन करून यशस्वीरित्या धम्मचक्र परिवर्तन दिन संपन्न झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटक चक्रधर देवसरकर (बामसेफ) यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी अध्यक्षस्थानी तंटामुक्त अध्यक्ष रामराव गायकवाड व प्रमुख पाहुणे कॉटन मार्केट अध्यक्ष बाळू पाटील चंद्रे, वंचित महासचिव प्रशांत विनकरे ,पोलीस पाटील रमण रावते ,साहिल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली धम्मचक्र परिवर्तन दिनाचे महत्त्व काय याबाबतीत विद्वान केवटे (बामसेफ) यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आले.
धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या रॅलीसाठी व या कार्यक्रमासाठी स्वप्नील चिकाटे ,अमोल पाटील, ज्ञानेश्वर कांबळे, राजपाल मुनेश्वर ,करण भरणे, राजू पाटील यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले व मिलिंद चिकाटे (एस.बी.आय) यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या