कमलाकर दुलेवाड, बिटरगाव
हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळवुन आपल्या असंख्य अनुयायांना सोबत घेऊन 14 आक्टोंबर 1956 अशोक विजयादशमीला नागपूरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.
शांतीदूत बौद्ध विहार बिटरगांव बु येथे सर्व प्रमुख पाहुणे व बौद्ध बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.व त्या ठिकाणचा झेंडावंदन कमलाकर माधवराव दुलेवाड यांच्या हस्ते करण्यात आले.त्या नंतर शांतीदूत बौद्ध विहार येथील झेंडावंदन पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्रिषरण, पंचशील बुध्दवंदनेसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच प्रकाश पेंधे, पोलीस कां. रमेश आडे,शेख शेफी, कमलाकर दुलेवाड, श्रावण गायकवाड, कृष्णा विनकरे,शांतीदूत बौद्ध विहार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान संकुलन वाचनालयाचे बिटरगांव बु चे अध्यक्ष संदेश शंकरराव कांबळे होते.यावेळी बिटरगांव बु येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान संकुलन वाचनालयाची लोकवर्गणीतून भव्यदिव्य स्थापना करण्यात येत असून यामध्ये प्रत्येकांच्या सहकार्याने वाचनालयासाठी पाच लाख रुपयेच्या वर रक्कम जमा झाली असुन या वाचनालयातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी मिळेल व वाचनाने विचार समृद्ध होईल, विचारशक्ती, कल्पनाशक्ती वाढेल. मनुष्य चिंतनशील बनेल. स्वत:चे विचार मांडायला लागेल. त्याचे विचार तर्कसंगत असल्यास इतरांना त्याचा फायदा होईल. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांनी प्रचंड वाचन केले, चिंतन केले, मनन केले आज त्यांच्या तर्कसंगत विचारांचा संपूर्ण जगाला फायदा होत आहे.गावातील शिक्षण क्षेत्रातील अडचणी दूर वाचनालयामुळे होईल.या वाचनालयाच्या संकल्पनेचा विचार व वाचनालयासाठी धडपड करत असलेल्या युवकांनी ज्ञानाचा पुढाकार घेऊन सर्वांना शिक्षणाची संधी मिळेल या कौतुकास्पद कार्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान संकुलन वाचनालयाचे अध्यक्ष संदेश शंकरराव कांबळे व सहकार्याची दखल घेऊन ठाणेदार प्रताप भोस व उपसरपंच प्रकाश पेंधे व प्रमुख पाहुणे यांनी सत्कार केला.व ठाणेदार प्रताप भोस व उपसरपंच यांनी वाचनालयासाठी सदातत्पर राहुन सहकार्य करीन असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंता नरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंदराव वाठोरे यांनी मानले.या वेळी कार्यक्रमाला विजय विनकरे , धम्मपाल इंगोले,संदीप इंगोले ,सुभाष विणकरे ,भास्कर कांबळे ,आनंदराव वाठोरे ,वसंता नरवाडे, शोभराज विणकरे, नागसेन सोनूले ,राजरत्न दवणे, मनोहर कांबळे, धम्मपाल इंगोले ,दिनेश कांबळे ,विशाल धुळे ,चांदराव इंगोले ,
यशवंत खिल्लारे ,गोपीनाथ नरवाडे, प्रकाश घोडगे ,अनिल घोडगे, कोंडबा इंगोले ,शंकरराव कांबळे, उत्तम सोनूले, दिनेश गायकवाड ,असंग भवरे , विशाल नरवाडे व समस्त मिलिंद युवक मंडळ गावातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या