संदीप पेंटेवाड -ब्राम्हणगाव
येथून जवळच असलेल्या बोरी चा येथील खांबावरचे लाईट अनेक दिवसापासून बंद असल्याने गावात अंधार पसरलेला आहे. सध्या सणासुदीला दिवस सुरु असून लाईट बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने लाईट तातडीने बसवण्याची मागणी विनोद माने यांनी व गावकर्यांनी केली आsहे.
तालुक्यातील मतखंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरी व परिसराने अनेक पुढारी दिलेले आहेत. या च पुढाऱ्यांच्या गावात अंधार असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.गावाचा प्रमुख या नात्याने सरपंच यांची ही जबाबदारी असताना सरपंच आपल्या जबाबदारी च्या दूर पळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तसेच बोरी येथील ग्रामसेवकाचे सुद्धा गावाकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड असून तात्काळ स्ट्रीट लाईट नाही बसवल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. यावेळी विनोद माने, अंकुश माने, सखाराम माने, शुभम माने व गावकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या