ढाणकी प्रतिनिधी
येथिल हनीफ मास्टर उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन योजने अंतर्गत मुलींना सायकल वाटप करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयडियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सैयद मक्सुद अली पटेल उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ढाणकी नगर पंचायत चे उपनगराध्यक्ष शेख जहीर जमीनदार, साजीद जहॉगीरदार उमरखेड, शेख अ. मजीद सौदागर, हाजी शेख इब्राहिम, अजीज खॉ पठाण, सैयद ईमरान अली इत्यादी उपस्थित होते या वेळी ICT आय सी टी विनर शेख शफी सर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सैयद मक्सूद अली पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाळेचे शिक्षक सैयद जहीरोद्दीन यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक सैयद आबीद यांनी मानले.कार्यक्रम यसस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक मो.अशफाक, सैयद हुमायूँ, शेख मुजाहिद, शकील बेग, मुजीब अहमद, जावेद खान, शेख दौलत, पाशा खान, शेख अनवर, शेख मुख्तार आदिंनी परीश्रम घेतले।
0 टिप्पण्या