दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर शहर हे नांदेड जिल्ह्यातील अवैद्य धंद्याचे केंद्रबिंदू बनले असून दररोज करोडो रूपयाचा गुटखा, दारू, जगार, आम्लीजन्य पदार्थांमधून शहरात उल्लाढाल पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने केला जाते. पण या अवैद्य धंदा करत असलेल्या व्यक्तींवर कुठलीच कार्यवाही केल्या जात नाही. कधीतरी एखाद्या गटखा किंगवर कार्यवाही करायची. आणि प्रकरण शांत झाले कि, जशास तसे वागायचे अशीच सवय हिमायतनगर येथील पोलीस प्रशासनाला पडली आहे. नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुका एक नंबरवर असताना पोलीस प्रशासन यांच्यावर कार्यवाही करत नसल्याने आज एलसिबीच्या पथकाने हिमायतनगर तालुक्यात गुटख्याने भरलेल्या बोलेरो पिकअपवर धाड टाकून जवळपास १५ लाख ८०हजाराचा गुटखा पकडला आहे.
सविस्तर माहीतीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण व त्यांच्या पथकाने हिमायतनगर-सवना रस्त्यावरून जात असलेल्या एम एच-२६ बीई- ५७८५ या क्रमांकाच्या बोलेरो पिकअप ला थांबवून पाहणी केली असता त्या गाडीत गुटखा असल्याचे समजल्याने बोलेरो पिकअप ताब्यात घेऊन अंदाजे १५ लाख ८० हजाराचा गुटखा हस्तगत केल्याची माहीती मिळाली आहे. त्यावरून वाहनचालक शे.गफ्फार शे. बाबू रा.रहीम कॉलनी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात हिमायतनगर पोलिस ठाण्यात कलम 26 (02:27) अन्नसुरक्षा व मानके 2006 कलम 2011 6 कलम 30 पब्लिक 27 59 74 व कलम 188,272, 273, 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत. जप्त करण्यात आलेला मिल हिमायतनगर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला असून याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर गुटख्याची खरी किंमत समोर येणार आहे.
हिमायतनगर शहरातील अवैद्य धंदे करणाऱ्या माफीयांच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होत असून टोलेजंग घर बांधुन काढले आहेत. शहरातील अवैद्य धंदे करणाऱ्या व्यक्तींची संपत्ती कुठे-कुठे आहे, कशी वाढली, त्यांचा व्यवसाय काय आहे, या सर्व बाबींची पोलीस प्रशासनाकडून चौकशी करण्यात येईल का ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांच्या मनात घोंगावत आहे.
0 टिप्पण्या