दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर
मागील महिण्यात हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने हाताशी आलेले पिक पावसाने वाहुन नेले. त्यामुळे शेतकरी पुर्णत: हतबल झाला आहे. पडणारा मुसळधार पाऊस आणि शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या नियोजना अभावी पैनगंगा नदीला पुर आल्याने शेतीच्या साहित्या बरोबर पिक तर वाहुन गेले परंतु जमिनी पुराच्या पाण्याने खरडून गेल्याने जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे.
कोरोनाच्या महामारीतून बाहेर निघण्याची महाराष्ट्र धडपड करत असतनाच महाराष्ट्रला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील शेती अगदी जलमय झाली होती. सोयाबीन , कापूस ,तूर या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसाने हिराऊन नेला आहे. दुबार पेरणी करण्यासाठी सावकार, फायन्स कंपन्याचे कर्ज घेतले आणि आता अतिवृष्टीमुळे उद्भभवलेल्या संकटामुळे बळीराजा मरणाच्या दारात उभा टाकला आहे. तो या वाईट प्रसंगी सरकारकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहे. या सर्व बाबीची दखल घेऊन शासनाने तात्काळ हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी यासाठी हिमायतनगर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, जिल्हा युवक उपाध्यक्ष सरदार खान, उदय देशपांडे, सरपंच मारोती वाडेकर, लालू टेकेवाड, आशितोष बोरेवाड, अंकित राठोड, प्रशांत सुर्यवंशी, गंगाधर चांदनकर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या