हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या भाजपाची मागणी

 


दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी

*मागील पंधरा दिवसापासून सुरू  झालेल्या अतिवृष्टी व  गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यासह पूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यात सुद्धा शेतकऱ्याचे 100% नुकसान झाल्यामुळे आज घडीला शेतकऱ्यांच्या मागणीबाबत महाराष्ट्र सरकार गंभीरतेने घेऊन गोर गरीब शेतकऱ्याचे चे सर्व काही उध्वस्त झाल्यामुळे तात्काळ त्यांना सरकारतर्फे मदत करण्यात यावी व पूर्ण तालुका ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत देण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

         भाजपा  हिमायतनगर तालुक्याच्या वतीने दि.४/१०/२०२१ रोजी यासंदर्भात  भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून श्री शामजी भारती महाराज (माहुरगड) (अध्यात्मिक आघाडीचे  जिल्हाध्यक्ष नांदेड)व किसान मोर्चा जि.सरचिटणीस नांदेड  सुधाकर पाटील सोनारीकर याच्या  प्रमुख उपस्थिती मध्ये निवेदन देणात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आशिषभाऊ सकवान,भाजपा उपाध्यक्ष किशनराव वानखेडे, कांता गुरू वाळके, यलप्पा गुंडेवार,शहर अध्यक्ष खंडू चव्हाण, युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, सुभाष माने, जलप्पा गोसलवाड, सरपंच जीवन जैस्वाल, गिरीश महाराज, चांदराव पाटील, वामनराव पाटील मिराशे, नितिन मुधोळकर, परमेश्वर सुर्यवंशी, बालाजी ढोणे यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित  होते*....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या