दाऊ गाडगेवाड हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टी आणि पुरातून वाचलेले सोयाबीन काढण्याची शेतकरी वर्गामध्ये गडबड चालू आहे. अधुन-मधुन मेघ गर्जत आहेत तर अनेक ठिकाणी तालुक्यात दमदार पाऊसही झाला.
.पुन्हा पाऊस येईल आणि शिल्लक राहीलेल्या सोयाबीन पिकाची नासधुस होईल या भीतीने शेतकरी घाई गडबडीत सोयाबीन मळणी यंत्रातुन काढणी चालू आहे. मात्र ही अती घाई सवना येथील शेतकरी मोहन अनगुलवार शेतकऱ्याच्या जीवावर बेतली. मळणी यंत्रातून सोयाबीन काढत असताना मोहन अनगुलवार हा शेतकरी सोयाबीन सोबत तोही मळणी यंत्रात गेल्याने सदरील शेतकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मत्यु झाला. ही घटना आज दि. ४/१०/२०२१ रोजी अंदाजे २ वाजताच्या सुमारास घडली. सवना गावासह शेतकरी वर्गामध्ये शोककळा पसरली आहे.
0 टिप्पण्या