जमिनीचे माती परीक्षण करूनच शेतकर्‍यांनी ऊस, केळी, हरबरा, गहू या पिकांची पेरणी करावी, राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांचे शेतकर्‍यांना आवाहन.


दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी -

शेतकर्‍यांनी शेतामध्ये उस, केळी, पपई, हरभरा, गहू व इतर पिकांची पेरणी करण्या अगोदर आपल्या जमिनीचे मातीचे परीक्षण करून पिकाची पेरणी करावी जेणेकरून जमिनीतील उपलब्ध घटकाची माहिती मिळून आपल्याला पिकांना योग्य त्या खताची मात्रा देता येईल व पिकांचे उत्पन्न वाढवता येईल. भरमसाठ खताची मात्रा न देता योग्य मात्रा वापरल्यास शेतकर्‍यांची आर्थिक बचत होईल, यासाठी शेतकर्‍यांनी जमिनीचे मातीचे परीक्षण अवश्य करावे, असे आवाहन लिंगापूर ता. हदगाव येथील राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना केले आहे.


                 माती परीक्षण केंद्रामुळे परिसरातील शेतकर्‍यांना आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करणे सोयीचे आणि जवळच झाले आहे. किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर, अर्धापूर, उमरखेड, महागाव या तालुक्यांतील शेतकर्‍यांना जवळचे एकमेव शासनमान्य, कृषि विभागाचे मान्यताप्राप्त माती परीक्षण केंद्र स्थापन झाले आहे. या परिसरात अगोदर कुठही माती परीक्षण केंद्राची सोय नव्हती, हीच गरज लक्षात घेता शेतकर्‍यांना जवळच सर्व सोयी सुविधांनी युक्त माती परीक्षण केंद्राची स्थापना भागवत देवसरकर यांनी केली आहे. शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीचे येणार्‍या रब्बीच्या हंगामात मातीचे परीक्षण करून शेतामध्ये पिकांची लागवड करावी व आपली प्रगती साधावी, असे आवाहन भागवत देवसरकर यांनी केले आहे

माती नमुने तपासण्यासाठी अत्याधुनिक, अत्यावश्यक, सुसज्ज व मशिनरीसह प्रशिक्षित कर्मचारी असून शेतकर्‍यांना त्यांच्या मातीच्या नमुन्याचा रिपोर्ट दोन दिवसात मिळणार आहे. यासाठी शेतकर्‍यांनी माती परीक्षण केंद्राचे कर्मचारी महेश गोरेगावकर, नंदू पाटील नरवाडे, अनिल देवसरकर, अमोल देवसरकर, निरंजन देवसरकर, वैभव देवसरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या