ढाणकी प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटनेची बिटरगाव पोलीस स्टेशनं कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी- परसराम चंपतराव ब्रह्मटेके ( टेंभूरदरा ) उपाध्यक्षपदी - बालाजी शिवाजीराव भोयर ( गोविंदपुर )सचिव सचिवपदी- सौ सुलोचना अर्जुन राठोड ( चिंचोली ढा.) तर मार्गदर्शक म्हणून अनिल कांबळे (सावळेश्वर) यांची निवड करण्यात आली.
बिटरगाव पोलीस स्टेशन येथे झालेल्या सभेमध्ये ह्या निवडी घोषित करण्यात आल्या. या स्टेशनं अंतर्गत एकूण 32 गावामध्ये 30 पोलीस पाटील कार्यरत आहे त्या मधून या निवडी झाल्यात.
पोलीस पाटील ग्रामप्रशासन मधील महत्वाचा घटक असतो. गावातील कोणत्याही घटनेची माहिती पोलीस स्टेशनं तसेच महसूल विभागाला कळवने व त्यांना मदत करणे हे महत्वाचे काम त्यांचे असते. ग्रामस्थरावरील या महत्वाचा दुवा असलेल्या संघटनेची ही नवीन कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली. या वेळी कार्यकारिणी चे सर्व सदस्य व बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रताप भोस, उपनिरीक्षक कपिल मस्के, पोलीस बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या