नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचे नाटक बंद करा - सुनिल पतंगे.


दाऊ गाडगेवाड हिमायतनगर

नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. यात सोयाबीन पिकासह कापूस, तुर व इतर कडधान्य  पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे हाताशी आलेलं पिक पावसाच्या पाण्याने वाहुन नेले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतात न जाता सरसकट शेतकऱ्यांना शासनाने  आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.

        .सविस्तर महीतीनुसार, हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवस परतीचा मुसळधार पाऊस झाला आहे. इसापुर धरण १००% भरल्याने धरणातुन पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचे पाणी आणि धरणाचे पाणी आणि शासनाच्या चुकीच्या धारणामुळे पैनगंगा नदीला महापुर आला. महापुरामुळे हदगाव- हिमायतनगर तालुक्यासह उमरखेड, महागाव तालुक्यातील हजारो हेक्टर जमिन पाण्याखाली गेली. 

        शेती जलमय  झाल्याने शेतातील सोयाबीन, कापूस, तुर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीतील पिकाच्या नुकसानिची माहीती ७२ तासात शासनानाला कळवण्याच बंधन घातल्याने शेतकरी वर्ग चिंतेने व्याकुळ झाला आहे. कारण आँनलाईन तक्रार करायची झाली तर वेबसाईट चालत नाही. अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार करायची झाली तर कृषी  अधिकारी मोबाईल बंद करून कार्यालयाला दांडी मारून गायब झाले आहेत. कृषी  विभगातील जनसंपर्क अधिकिरी सुद्धा  गायब असल्याने शेतकऱ्यांनी तक्रार करायची कोणाकडे ? हाही शेतकऱ्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे.  

          आज पर्यंत पंचनामे करून, शेतात जाऊन फोटो काढून, कागद काळे करून किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाने दिली. केवळ कागद काळे करून आणि पंचनाम्याचे नाटक करून शासन काय साध्य  करणार आहे. पैनगंगा नदीला महापुर आला त्यातुन शेतीचे नुकसान झाले ते दिसत नाही का असा प्रश्न राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे यांनी शासनाला विचारला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्याचे नाटक बंद करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या